Thursday, September 28, 2023
Homeआंतरराष्ट्रीयZP शाळेतील शिक्षक झाला "ग्लोबल टीचर" , शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७...

ZP शाळेतील शिक्षक झाला “ग्लोबल टीचर” , शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर

४ डिसेंबर २०२०,
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. शाळा ही पहिली गुरू आहे असं म्हणतात. शिक्षक शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला घडवतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका तसेच QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील कोणत्याही शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला नाही. तर भारताला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात ते ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मेहनतीमुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. हा हा पुरस्कार सोलापूरातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांना तब्बल 7 कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम येथे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments