Saturday, March 2, 2024
Homeआरोग्यविषयकयुवा नेते राजेश आरसुळ यांच्यावतीने शिवजयंती निमित्ताने मोफत चष्म्याचे वाटप, नेत्र तपासणी...

युवा नेते राजेश आरसुळ यांच्यावतीने शिवजयंती निमित्ताने मोफत चष्म्याचे वाटप, नेत्र तपासणी आणि मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे,शहराध्यक्ष ऍड सचिन भोसले यांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग क्र २७ चिंचवड मधील शिवसेना शाखेत १९ फेब्रुवारी रोजी वानखेडे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तसेच मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे चिंचवड भागातील युवा नेते राजेश आरसुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड विधानसभेचे शिवसेनेचे शाखा संघटक संतोष सौंदनकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक वैशाली मराठे,आणि शिवसैनिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर नेत्र तपासणी शिबीर सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत शिवसेना शाखा, वेताळनगर याठिकाणी होणार आहे. शिबिराला येताना आधार कार्ड, रेशनकार्ड यापैकी एक आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे.

युवा नेते राजेश आरसुळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहे. नागरिकांनी देखील त्यांच्या कार्याची भरभरून कौतुक केले आहे. यापुढेही समाज हेतू उपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत असे राजेश आरसुळ यांनी सांगितले.

२० फेब्रुवारी २०२२ रोजी रस्टन कॉलनी मधील दत्त मंदिर येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते राजेश आरसुळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments