टाटा मोटर्स , बजाज ऑटो , गरवारे , फिनोलेक्स, थरमॅक्स आणि अशा किती तरी औद्योगिक कंपन्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे नावलौकिक अभिमानाने देश तसेच जागतिक पातळीवर मिरवत आहेत या बरोबरच आता जागतिक पातळीवर स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, स्पोर्टस् सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर पुढे येत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील औद्योगिक क्षेत्राचे उल्लेखनीय योगदान आहे. या मोठ्या औद्योगिक कंपन्यावर आधारित बरेच लघु , मध्यम उदयॊग शहरात आहेत व ते शहर विकासात महत्वाची भूमिका बजावत आहेत त्यापैकी एक म्हणजे शितल ग्रुप आहे.शितल ग्रुपचे संचालक मा. अनिल सौंदडे यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी न्युज १४ मीडिया नेटवर्कच्या वतीने ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) हा पुरस्कार उद्या गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.
शितल ग्रुपच्या माध्यमातून शितल इंडस्ट्रीज ,एफिशियंट इंजिनियरिंग, शितल स्पेसेस अशा विविध औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फत पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक विकासात महत्वाचा वाटा उचलत आहे, अनिल सौंदडे यांनी खूप कमी वयात औद्योगिक व्यवसायात यश मिळवले असून त्यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. औद्योगिक क्षेत्रात कामात करत असताना त्यांना दलित इंडियन चैंबर ऑफ कॉमर्स म्हणजे ( डिक्कीची ) महत्वपूर्ण साथ मिळाली असून यामाध्यमातून ते आणखी उंच व्यवसायीक भरारी घेण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कार्यक्रमाची माहिती
” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’
कोठे पार पडणार,
स्थळ ;- ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुणे -१९
दिनांक आणि वेळ
गुरुवार ७ एप्रिल २०२२, सायंकाळी ५ वाजता..