२० जानेवारी २०२०
‘वीज-पाण्याचा योग्य उपयोग करण, तसेच घरातील इतर व्यवस्थांचा योग्य प्रकारे उपयोग करणे ही देखील देशभक्ती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमात दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे आपण मेक इन इंडियाच्या वस्तू खरेदी केल्या तर त्याचा फायदा देशाला होतो,ते आपले कर्तव्यही आहे. आपण आपलं कर्तव्य योग्यरितीने पार पडायला हवे अशा शब्दांत विद्यार्थ्यांशी देशभक्तीचा मंत्र देत संवाद साधला. ‘हॅशटॅग विदाउट फिल्टर’असा विद्यार्थी आणि माझा संवाद असल्याचे म्हणत मोदींनी नव्या पिढीशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला.
इयत्ता १० वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच तेवढे लक्ष केंद्रित करू नये. आपले माइंड फ्रेश करण्यासाठी काही अभ्यासाव्यतिरिक्त आवांतर गोष्टींसाठीही काही वेळ द्यायला हवा असे मोदींनी ह्या कार्यक्रमात म्हणाले.मोदींनी विद्यार्थ्यांना ताण दूर करण्याचा ‘गुरूमंत्र’दिला.राजस्थानच्या स्वामी विवेकानंद गव्हर्नमेंट मॉडल स्कूलमधील दहावीची विद्यार्थिनी मोदींना प्रश्न विचारला कि, बोर्डाच्या परीक्षेबाबत ऐकलं तरी मूड खराब होतो.त्यातून बाहेर पडण्यासाठी काय टिप्स द्याल त्यावर मोदींनी उत्तर दिलं युवा वर्गाचा मूड ऑफ व्हायलाच नको असं मला वाटतं.