साऊथ चित्रपटसृष्टीत केवळ चित्रपटांवरच नव्हे तर खासगी कार्यक्रमांवरही पाण्यासारखा खर्च केला जातो. साऊथचे अनेक सुपरस्टार आहेत ज्यांचा विवाह सोहळा आजही लोकांच्या लक्षात राहिले आहेत. साऊथ स्टार म्हणजे ‘RRR’ फेम जुनियर एनटीआरचे लग्न दक्षिणेतील महागड्या आणि चर्चित लग्नांपैकी एक मानले जाते. त्याच्या लग्नात कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च केले होते. या खर्चातून 3 छोट्या बजेटचे चित्रपट बनतील इतका पैसा खर्च त्याच्या लग्नात करण्यात आला होता.

ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या ‘देवरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर साऊथ चित्रपटसृष्टीत एन्ट्री करत आहे. ज्युनियर एनटीआरच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याने अरेंज मॅरेज केले होते. 5 मे 2011 रोजी त्यांनी लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न केले.

ज्युनियर एनटीआरचे लग्न भव्य-दिव्य असे होते आणि प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने काळजी घेण्यात आली होती. हा विवाह केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

लक्ष्मी प्रणती, जूनियर एनटीआरची पत्नी, हिचा जन्म 18 मार्च 1992 रोजी हैदराबाद येथे झाला. लग्नाच्या वेळी तिचे वय 18 आणि एनटीआर 26 वर्षांचे होते. लक्ष्मी ही उद्योगपती नरणे श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी यांना दोन मुले आहेत.

ज्युनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मीने लग्नाच्या दिवशी नेसलेली पिवळ्या रंगाची साडीही खास होती. या साडीची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कांजीवरम साडी सोन्या-चांदीने विणली गेली होती.लक्ष्मीने सुंदर साडीसह सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने घातले होते. नेकलेस आणि मॅचिंग बांगड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर, ज्युनियर एनटीआरने पारंपारिक पांढरा धोती कुर्ता परिधान केला होता.

ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी यांच्या लग्नाचा मंडप 18 कोटींमध्ये बांधण्यात आल्याची बातमी आहे. या लग्नात 3000 सेलिब्रिटी पाहुणे आले होते. या बातमीवर विश्वास ठेवला तर या लग्नाचे एकूण बजेट 100 कोटी होते आणि हे दक्षिणेतील सर्वात महागडे लग्न मानले जाते.