पिंपरी-चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक योगिता हनुमंत तरडे यांना ‘योगरत्न’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा गौरव २२ जून रोजी (रविवार) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित भव्य समारंभात देण्यात आला.
हा कार्यक्रम आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, AGMA आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल – आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या योगशिक्षक आणि योग थेरपीस्ट यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि उद्घाटक म्हणून डॉ. बाळासाहेब पवार, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल (शिक्षण सम्राट) उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज दांडगे यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात डॉ. नितीन राजे पाटील (व्हाईस चेअरमन, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व प्रदेश कार्याध्यक्ष, आयुष विभाग – राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल), डॉ. सतीश कराळे (चेअरमन, आयुष इंटरनॅशनल), तसेच डॉ. बाबुराव कानडे (अध्यक्ष, आयुष इंटरनॅशनल) यांचीही मान्यवर उपस्थिती होती.
योगिता तरडे यांचा योगप्रसार आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.