Monday, July 14, 2025
Homeआरोग्यविषयकसंत निरंकारी मिशन मार्फत २१ जूनला संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे...

संत निरंकारी मिशन मार्फत २१ जूनला संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे योग दिवसाचे आयोजन

संत निरंकारी मिशन मार्फत ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ निमित्ताने शुक्रवार, दि. २१ जून २०२४ रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी ६:०० वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या निर्देशनाखाली खुल्या प्रांगणांत तसेच उद्यानांमध्ये योग दिवसाचे उत्साहपूर्वक आयोजन करण्यात येणार आहे. भोसरी येथील संत निरंकारी सत्संग भवन,दिघी येथे विशाल योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय ‘महिला सशक्तिकरणासाठी योग’ असा देण्यात आला आहे जी आज काळाची गरज आहे यात तिळमात्र शंका नाही. संत निरंकारी मिशन देखील वेळोवेळी महिला सशक्तिकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रयासरत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिलाई व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण केंद्र, ब्यूटीशियन कोर्स, टयूशन सेंटर इत्यादींचा समावेश आहे.

संत निरंकारी मंडळाचे समाज कल्याण प्रभारी आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती दिली की, सन २०१५ पासूनच संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत ‘योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेमध्ये यावर्षीदेखील ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ कार्यक्रमाचे विशाल रूपात आयोजन संपूर्ण भारतवर्षातील जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने केले जाणार आहे.

‘योग’ ही एक अशी प्राचीन पद्धत आहे ज्याद्वारे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य संतुलित केले जाते. योगाच्या नियमित अभ्यासाने तणाव मुक्त जीवन जगता येते.

महिलांच्या सशक्तिकरणात योगाला विशेष महत्व आहे. वर्तमान काळात जिथे महिला गृहस्थ जीवनाबरोबरच विविध कार्यक्षेत्रांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत अशा परिस्थितीत त्यांच्या व्यस्त जीवनामध्ये योग ही एक आवश्यक बाब झाली आहे ज्यायोगे त्यांना आपल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी ऊर्जा व सहायता प्राप्त होते.

सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनीही आपल्या विचारांमध्ये ‘स्वस्थ मन – सहज जीवन’ अवलंबण्याविषयी मार्गदर्शन करताना हेच समजावले आहे, की आपण आपले शरीर ही ईश्वर प्रदत्त अमूल्य देणगी समजून ते स्वस्थ व निरोगी ठेवले पाहिजे.

थोडक्यात, अशा स्वास्थ्यवर्धक कार्यक्रमांचा उद्देश केवल हाच आहे, की धावपळीच्या जीवनात आपल्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देऊन ती अधिकाधिक उत्तम ठेऊन एक स्वस्थ जीवन जगायचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments