Friday, September 29, 2023
Homeआरोग्यविषयकवायसीएमएच रुग्णालयात आज पासून नाॅन कोव्हीड रुग्णांसाठी उपचार सुरु

वायसीएमएच रुग्णालयात आज पासून नाॅन कोव्हीड रुग्णांसाठी उपचार सुरु

३ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी-चिंचवड शहरात १० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय कोविड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित केले होते. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत होते. मात्र, आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने तांत्रिक बाबींची पडताळणी करून कोविड समर्पित वायसीएम रुग्णालय आज (मंगळवार) पासून नॉन कोविड रुग्णांसाठी ५० टक्के भागात सुरू केले असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या रुग्णांना कोविडचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आजपासून इतर रुग्णांसाठी वायसीएमएच ५० टक्के सुरू केले आहे. वायसीएममध्ये दोन जिने आहेत. मधले वेगवेगळे आहेत. एका बाजूने कोविड तर एका बाजूने नॉन कोविड रुग्णांसाठी एंट्री ठेवली जाणार आहे.
नॉन कोविड रुग्णांना कोविडचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणार आहोत. त्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.


आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गणोशोत्सवानंतर शहरातील रुग्णसंख्येत वाढ झाली होती. नवरात्र उत्सवात रुग्णवाढ झाली नाही. मात्र, गुजरात, पश्चिम बंगाल इतके आपल्याकडे नवरात्रीला महत्व नाही.
त्यामुळे आपल्याकडे नवरात्रीनंतर रुग्णसंख्या वाढलेली नाही; मात्र आताच उतरता आलेख पाहून दिवाळीत नागरिक बेफिकीर राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर दुसरी लाट येईल, अशी भीती आहे. कोरोना आपल्यातून गेलेला नाही.

दुसरी लाट येवू द्यायची नसेल तर, बेफिकिरी राहून चालणार नाही. आताच नियोजन आणि व्युहरचना करावी लागणार आहे. कोविड केअर सेंटर पूर्ण अर्थाने बंद केलेले नाहीत.तीन हजार बेडची उपलब्धतता आहे. खासगी रुग्णालयांना नॉन कोविडसाठी बेड उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या आहेत. जम्बो, ऑटो क्लस्टर १०० टक्के क्षमतेने चालू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments