Tuesday, February 27, 2024
Homeगुन्हेगारी“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं...

“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट

पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच ट्वीट करत पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा केलाय. आपल्या या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमं लावण्यात आली याचीही माहिती दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, “मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. FIR एफआयआर क्रमांक ००१२ आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५”

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफआयआरची कॉपी देखील पोस्ट केलीय. यात शिवसेनेच्या ८ स्थानिक नेत्यांच्या नावांचाही उल्लेख आहे.

एफआयआरमधील ८ शिवसेना नेत्यांची नावं खालीलप्रमाणे,
१. संजय मोरे (शिवसेना पुणे शहराध्यक्ष)
२. चंदन साळुंके (पदाधिकारी)
३. किरण साळी
४. सुरज लोखंडे
५. आकाश शिंदे
६. रुपेश पवार
७. राजेंद्र शिंदे
८. सनि गवते

नेमकं काय घडलं होतं…?
किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments