पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण वाढ कायम असून आज दि १९ जानेवारी २०२२ रोजी ३५०५ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला यामध्ये १ पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील ० मनपा हद्दीबाहेरील आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३०९०२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८६१६६ वर पोहोचली आहे.आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
तसेच उद्या गुरवार दिनांक २० जानेवारी रोजी शहरातील लसीकरण केंद्र नियमितपणे राहतील
आजपर्यंत शहरातील एकूण लसीकरण ३१९४७५८ एवढे झाले आहे.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.
टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे