Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकचिंताजनक...! राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला

चिंताजनक…! राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला

महाराष्ट्रासाठी काळजीची बातमी आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे. या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्यानं या करोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा काळजीत आहे.

या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होतातो दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण आहे.

ओमिक्रॉन बाधित आढळलेला हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला, मात्र इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

कल्याण डोंबिवलीतील या रूग्णाला २४ नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय या रूग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. ते सर्व कोविड निगेटीव्ह निघाले आहेत. दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासातील रूग्णाच्या २५ सहप्रवाशांची देखील करोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

दक्षिण अफ्रिकेत सर्वप्रथम ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाहूल लागलेल्या डॉ. अँजेलिक कोट्झी यांनी यासंदर्भात एएनआयला दिलेल्या एक्स्क्लुजिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणतात, “ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बीटा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्युटेशन असलेला व्हेरिएंट आहे. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग अधिक असतो. शिवाय, तुम्हाला जर या व्हेरिएंटची लक्षणं माहिती नसतील, तर त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष होऊ शकतं इतका तो बेमालूमपणे पसरू शकतो”.

Omicron ची लक्षणं काय?
डॉ. कोट्झी यांनी सर्वप्रथम या नव्या व्हेरिएंटची माहिती जगाला दिली होती. त्यांनी तपासणी केलेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून ओमायक्रॉनची संभाव्य लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. त्या म्हणाल्या, “मी तपासलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने थकवा हे लक्षण दिसून आलं. अंगदुखी देखील जाणवू शकते. काहींना प्रचंड डोकेदुखी आणि थकवा आला होता. पण यापैकी कुणीही वास किंवा चव गेल्याची तक्रार केली नव्हती. तसेच, नाक बंद होणं किंवा खूप जास्त ताप देखील दिसून आला नाही”.

दरम्यान, आता राज्यातही ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करोना निर्बंध आणखी कठोर केले जातात का, हे पाहावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments