Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीदिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधीर दिन उत्साहात साजरा

दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधीर दिन उत्साहात साजरा

जागतिक सांकेतिक भाषा आणि जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग भवन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर पथनाट्याने झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनापासून दिव्यांग भवन फाऊंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट यांनी झेंडा दाखवून केली. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांकेतिक भाषा शिकणे ही काळाची गरज असून सर्वांनी ती भाषा आत्मसात करावी, असे मत व्यक्त केले.

जनजागृती फेरीत चिंचवड कर्णबधीर विद्यालय निगडी, सी.आर. रंगनाथन महाविद्यालय विश्रांतवाडी, पिंपरी चिंचवड कर्णबधीर असोसिएशन, फीन संघटना महाराष्ट्र यांसारख्या अनेक संस्था आणि दिव्यांग भवनचे कर्मचारी “शब्द जेव्हा मुखातून न येई, सांकेतिक संवादच आधार होई”, “हातात हात द्या विशेष मुलांना साथ द्या” असे नारे देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चिंचवड कर्णबधीर विद्यालय, निगडीच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढविला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती सदाकळे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि कर्णबधिर व्यक्तींच्या हक्कांवर, सांकेतिक भाषेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. याप्रसंगी अंबु गिरी, पांडुरंग गर्जे, परशुराम बसवा यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी मनोगतात दिव्यांग भवन येथे सांकेतिक भाषेचे वर्ग लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व सहभागी संस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आभार मानत दिव्यांग भवन विषयी सविस्तर माहिती देऊन सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता सांकेतिक भाषेतून राष्ट्रगीत सादरीकरणाने करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments