Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीजगविख्यात होमिओपॅथिक डॉक्टर अमरसिंह निकम यांचे हृदयविकारावरील पुस्तक स्पॅनिश भाषेत प्रकाशित.

जगविख्यात होमिओपॅथिक डॉक्टर अमरसिंह निकम यांचे हृदयविकारावरील पुस्तक स्पॅनिश भाषेत प्रकाशित.

दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर, सिविल, स्पेन येथे पार पडलेल्या लिगा जागतिक होमिओपॅथिक कॉन्फरन्सच्या कार्यक्रमामध्ये भारतातील होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर अमरसिंह निकम यांचे हृदयविकारावरील ‘होमिओपॅथी इन क्रिटिकल कार्डियाक डिसीजेस’ पुस्तक प्रकाशित केले गेले.
होमिओपॅथी मध्ये हृदयविकारावर पुस्तक लिहून ते स्पॅनिश भाषेमध्ये मध्ये प्रकाशित झालेले डॉक्टर अमरसिंह निकम हे पहिलेच भारतीय होमिओपॅथिक डॉक्टर आहेत.

या कॉन्फरन्स मध्ये सुमारे पाचशेहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर जगभरातून आलेले होते. यामध्ये विशेषतः अमेरिका, चायना, टर्की, जपान, जर्मनी, इंग्लंड, इटली या देशांतून जास्त होमिओपॅथिक तज्ञांचा समावेश होता.

होमिओपॅथिक शास्त्राचा वापर हा त्वचेचे विकार ऍलर्जीज अस्थमा आणि जुनाट रोगांवर्ती जास्तीत जास्त केला जात होता पण डॉक्टर अमरसिंह निकम यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि त्यांनी पूर्णपणे बऱ्या केलेल्या पेशंटच्या तपासणीवरून असे दाखवून दिले की होमिओपॅथिक शास्त्र हे हृदयविकारावर ती देखील तेवढेच प्रभावी आहे. या पुस्तकांमध्ये हृदयविकारावरील संबंधित हार्ट ब्लॉकेज म्हणजेच मायोकार्डियल इनफ्राक्शन, हार्ट फेल्युअर, व्हॉल्युलर स्टेनोसेस, ह्रुमेटिक हार्ट डिसीज यासारखे बरेचसे आजार ज्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही ते फक्त होमिओपॅथिक औषधाने कसे बरे केले आहेत हे शास्त्रीय दृष्ट्या सांगितले आहे. हे पुस्तक फक्त वैद्यकीय तज्ञांसाठी उपलब्ध आहे.

डॉक्टर अमरसिंह निकम हे पिंपरी पुणे येथे आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने शंभर बेडचे होमिओपॅथिक हॉस्पिटल चालवतात. यामध्ये ते फक्त हृदयरोगाचेच नाही तर मणक्याचे, प्रतिकार शक्तीशी निगडित, पोटाच्या संबंधित, जेनेटिक्स, किडनी, लिव्हर, अवयवांशी निगडित आजार अशा शरीरातील सर्व आजारांवर फक्त होमिओपॅथीने उपचार करून ते बरे करतात. या हॉस्पिटलमध्ये फक्त होमिओपॅथिक औषधांचा वापर केला जातो. ही हॉस्पिटल अशी यातील पहिले 100 बेडचे होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे. जगभरातून विविध डॉक्टर येथे इंटर्नशिप करण्यासाठी येत असतात.

भारतामध्ये देखील या पुस्तकाचे प्रकाशन हे माननीय मुख्यमंत्री फडणवीस सर यांच्या हस्ते 2019 मध्ये केले गेले होते. जगभरातील या पुस्तकाची मागणी पाहता स्पॅनिश डॉक्टर अँटोनिओ गिल जेव्हा डॉक्टर अमरसिंह निकम यांच्या आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल मध्ये तीन महिने शिकण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी ठरवले की या पुस्तकाचे भाषांतर आपण स्पॅनिश मध्ये सुद्धा करू शकतो जेणेकरून जास्तीत जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांपर्यंत या पुस्तकाचा फायदा होईल. या पुस्तक प्रकाशन सोहळ्या वेळी डॉक्टर अमरसिंह निकम यांच्या समवेत डॉ. मनिष निकम, डॉ. सुचित्रा निकम, प्रज्ञा पवार, स्पेन मधील डॉ. अँटोनिओ गिल हे देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments