Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीपुण्यात मिसळीचा जागतिक विक्रम, सात तासात तब्बल सात हजार किलो मिसळ तयार...

पुण्यात मिसळीचा जागतिक विक्रम, सात तासात तब्बल सात हजार किलो मिसळ तयार करून वाटप

१५ मार्च २०२१,
पुणेरी मिसळ चांगलीच प्रसिद्ध आहे. आता याच पुण्यात मिसळीचा एक विक्रम करण्यात आलाय. पुण्यातील सुर्यदत्त इन्स्टिट्यूटनं ‘विष्णू महामिसळ २०२१’ या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांनी युनिक बेंच मार्किंग वर्ल्ड रेकॉर्ड आज नोंदवला. यात त्यांनी ७ तासात ७००० किलो मिसळ बनवली. ३० लोकांनी ही मिसळ शिजवली.३ तासांमध्ये ३०० एनजीओंमार्फत ३० हजार गरजू लोकांना ही मिसळ वाटली.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने ही मिसळ बनवली. या मिसळीचा एक नवा विक्रम नोंदवण्यात आलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलीये. तब्बल ३२ रेकॉर्ड आज सुर्यदत्त इन्स्टिट्यूटनं आपल्या नावावर केलेत. मध्यरात्री २ वाजता मिसळ बनवायला सुरुवात झाली आणि सकाळी ८ वाजता ती बनवून तयार झाली. यानंतर ७ हजार किलोच्या मिसळची सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

या विषयी बोलताना मास्टर शेफ विष्णू मनोहर म्हणाले, “हा खूप चांगला अनुभव होता. ही सर्व मिसळ आम्ही चुलीवर तयार केली. याला सर्व कॉलेजच्या तरुणांचा उत्तम प्रतिसाद होता. आधीचे वर्ल्ड रेकॉर्ड हजारो लोक आजूबाजूला असताना झालेत. मात्र, हा रेकॉर्ड वेगळा आहे. कोविड असल्याने आजूबाजूला केवळ 20-25 लोक होती. तेवढ्याच लोकांच्या समोर ही मिसळ तयार करण्यात आली.”

या ७ हजार किलो मिसळीत काय काय घातलं?

या विक्रमी ७ हजार किलो मिसळमध्ये १२०० मोड आलेली मटकी,५०० किलो कांद्याची पेस्ट, प्रत्येकी १५० किलो आले आणि लसणाची पेस्ट,५० किलो हळद, ५० किलो तिखट, १०० किलो खोबरं, २०० किलो मसाला याचा उपयोग करण्यात आला. याशिवाय तब्बल साडेचार हजार लिटर पाणीही या मिसळमध्ये वापरण्यात आलं. ही मिसळ १० फूट बाय १० फूटची एकच कढई होती. या कढईची उंची ५ फूट आणि वजन १०००किलो. दुसरी कढई ७ फूटाची आहे. अशाप्रकारे दोन कढाईंचा उपयोग करुन आम्ही हा रेकॉर्ड बनवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments