Tuesday, December 10, 2024
Homeआरोग्यविषयकसरोगसी (नियमन) कायदाविषयक कार्यशाळा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी येथे संपन्न…

सरोगसी (नियमन) कायदाविषयक कार्यशाळा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी येथे संपन्न…

भारत सरकार तसेच राज्य शासनाने “ सरोगसी (नियमन) कायदा२०२१” व “सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा २०२१” दि.०४ मे २०२२ व दि.१३ जून २०२२ पासून लागू करणेकामी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर कायद्यांची अंमलबजावणी करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी, वैद्यकीय विभाग यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ञ, खाजगी टेस्ट ट्यूब बेबी (IVF) सेवा देणारे केंद्र धारक, सरोगसी सेवा देणारे केंद्र धारक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) यासारख्या संस्थांचे अध्यक्ष व सदस्य यांचेकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी, दुपारी.३.०० वाजता, चाणक्य सभागृह, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी या ठिकाणी करण्यात आलेले होते. सदर कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व डॉक्टर्स यांना “ सरोगसी (नियमन) कायदा २०२१” व “सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा २०२१” या कायद्याबाबत माहिती देण्यात आलेली असून सदर कायद्याच्या अंमलबजावणी करीता पिं.चिं. महानगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेमध्ये फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) चे डॉ.कुंदन इंगळे, डॉ.निलेश बलकवडे, डॉ.ममता ‍दिघे, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे डॉ.दिलीप कामत, डॉ.संजय देवधर, डॉ.विजय सातव, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन (IRIA) चे डॉ.माधव कुलकर्णी, डॉ.संदीप पानसरे तसेच पिं.चिं.मनपाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीचे सदस्य ऍड.मनिषा महाजन, डॉ.राजेंद्र करंबेळकर, डॉ.विभा झुत्सी, डॉ.मनिषा सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त श्री.अण्णा बोदडे, श्रीम.मुक्ती पानसे व पिं.चिं.मनपाचे अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, डॉ.सुनिता साळवे, डॉ.राजेंद्र फिरके, डॉ.तृप्ती सागळे, डॉ.ऋतुजा लोखंडे व पिं.चिं.मनपाच्या दवाखाना/रुग्णालयाचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) चे डॉ.कुंदन इंगळे यांनी “सरोगसी (नियमन) कायदा २०२१” व “सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा २०२१” कायद्याबाबत उपस्थित डॉक्टर्स यांना माहिती दिली अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी पॅनल चर्चेव्दारे डॉक्टर्स यांच्या या कायद्यासंदर्भात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देवून मार्गदर्शन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments