३०डिसेंबर,
पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित 19 वर्षाखालील मुलींच्या “विमेन्स व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर आज शानदार सुरुवात झाली, स्पर्धेचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप अभियंता विनय ओहोळ ह्यांचे हस्ते पार पडले ह्या प्रसंगी अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे,मोहन जाधव,भूषण सूर्यवंशी,आणि डॉ.विजय पाटील उपस्थित होते,
सकाळच्या सत्रातील दोन साखळी सामने झाले असून यामध्ये हेमंत पाटील अकॅडमी विरुद्ध एच के बाऊन्स अकॅडमी असा सामना रंगला त्यामध्ये हेमंत पाटील अकॅडमी विजयी झाले असून सामनावीर प्रज्ञा विरकर हि झाली असून ती हेमंत पाटील अकॅडमी ची खेळाडू आहे.
दुसरा सामना व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विरुद्ध पीवायसी असा झाला यामध्ये व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विजयी झाली असून सामनावीर
मानसी तिवारी हि वेंगसरकर अकॅडमी खेळाडू ठरली.
“विमेन्स व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत.