आपल्या समाजात वर्षानुवर्षे पुरूषांच्या समजल्या जाणाऱ्या कामांमध्ये स्त्रियाही पुढाकार घेऊ लागल्या आहेत. क्रीडा, कला, साहित्य उद्योग, शिक्षण, आदी क्षेत्रात महिलाही आता मागे राहिलेल्या नाहीत तसेच महिला रिक्षाचालक, महिला बस कंडक्टर, महिला पायलट या यादीत आतामहिला अॅम्ब्युलन्स चालकाची भर पडलीय.कोरोना काळात मोठ्या हिंमतीने अँब्युलन्स ड्रायव्हरचं काम पाडणाऱ्या अनिता गोसावी यांच्या याकार्यासाठी त्यांना कर्तृत्ववान महिला ” पिंपरी चिंचवड सन्मान ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कोरोना काळात अँब्युलन्स ड्रायव्हरचं काम करणे खूप जोखमीचे असून हि मोठ्या हिंमतीने अनिता गोसावी अँब्युलन्स ड्रायव्हरचं काम केलं आहे. . कोरोना काळात जेंव्हा कोरोना पेशेंटचे नातेवाईक त्यांच्या पासून दूर जात होते अश्या काळात स्वतःच्या हाताने त्या कोरोना पेशंट आणि त्यांचेमृत देह स्वतः उचलून ठेवत असत, लॉकडाऊन काळात शाळेमधील नोकरी गेल्यानंतर आता पुढे काय या प्रश्नांवर आता त्यांनी मात केली आहे. केवळ परिस्थिती मुळे करावे लागलेले काम आता मात्र त्या आनंदाने करत आहेत. एका वेगळ्या क्षेत्रात काम करताना त्यांनी स्वतः ची प्रेरणादायीओळख निर्माण केली आहे.यातून त्या आपल्या कार्यातून शहराचा गौरव वाढवत आहेत अशा या रणरागिणीस न्यूज १४ कडून पुढील वाटचालीसहार्दिक शुभेच्छा.
दरम्यान पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचेपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिलीआहे.
कार्यक्रमाची माहिती
” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’
कोठे पार पडणार,
स्थळ ;- ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुणे -१९
दिनांक आणि वेळ
गुरुवार ७ एप्रिल २०२२, सायंकाळी ५ वाजता..