Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीबाई, बुब्स आणि ब्रा...! अभिनेत्री हेमांगी कवीची सोशल मीडिया वरील पोस्ट चर्चेत

बाई, बुब्स आणि ब्रा…! अभिनेत्री हेमांगी कवीची सोशल मीडिया वरील पोस्ट चर्चेत

१४ जुलै २०२१,
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. एवढचं नव्हे तर हेमांगी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून समाजिक मुद्दे मांडणं असो किंवा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देणं यात ती कधीही मागे हटत नाही. नुकतच हेमांगीला एका व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत हेमांगीने या नेटकऱ्यांची बोलती बंद केली होती.

स्त्रींयांना त्यांच्या कपड्यांवरून तसचं अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलचं सुनावलं होतं. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवरदेखील एक पोस्ट शेअर करत समाजात स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे. स्त्रीयांना त्यांच्याच शारिरीक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने तिचं बेधडक मत मांडलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.

https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/4685927061426886

“बाई, बुब्स आणि ब्रा” या शिर्षकाखाली तिने ही पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”

पुढे हेमांगीने समाजात वावरताना मुलींना किंवा स्त्रीयांना त्यांच्या अंर्तवस्त्रामुळे येणाऱ्या बंधनावर तिचं मत पाडंलं आहे. हेमांगीच्या या बेधडक पोस्टवर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तिचं कौतुक केलंय. ते म्हणाले, “विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..खन म्हणुन वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी.”असं म्हणत प्रविण तरडेंनी त्यांच्या हटके स्टाइलने हेमांगीला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील हेमांगीचं कौतुक केलंय.”लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद आहे.” असं रसिका म्हणाली

महिलांनी बुजरेपणा सोडून व्यक्त व्हावं!
महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणो ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments