Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांचे आशीर्वाद घेऊन , रोहित पवार ईडी चौकशीला हजर

शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन , रोहित पवार ईडी चौकशीला हजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. तर, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत भारताचं संविधान हाती घेतलं होतं. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं डबघाईला आलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५० कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. ईडीनं रोहित पवार यांना त्यासंदर्भात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स देण्यात आलं होतं. रोहित पवार यांनी मी मराठी माणूस असून घाबरणार नाही, असं म्हटलं.

विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रोहित पवार पक्ष कार्यालयात आले. तिथं त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतली. यावेळी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणंचं पुस्तक देत रोहित पवार यांना आशीर्वाद दिला. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या कार्यालयातून ईडी कार्यालयासमोर जात असताना भारतीय संविधान हाती घेतलं होतं. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल, हा काळ आव्हानाचा आहे. आव्हानाचा सामना करु, संघर्ष करु पण संघर्ष करत राहू असं म्हटलं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो. आयकर, ईडी आणि सीबीआयच्या ९५ टक्के केसेस विरोधी पक्षावर आहेत, असं संसदेत सादर झालेला डाटा सांगतो. रोहित पवार याची संघर्ष यात्रा यशस्वी झाली. रोहित पवार यांच्याकडून तरुणांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments