Wednesday, September 11, 2024
Homeताजी बातमीघात का केला … ?? अजितदादांचा मोठा खुलासा...

घात का केला … ?? अजितदादांचा मोठा खुलासा…

अजित पवार यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर खुलासा केला आहे.

आज अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील या आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यानी म्हटलं की, आज जे काही शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आहे, त्यांच्यामध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. मी आणि इतर सहकाऱ्यांनी शपथ घेतली. पुढेही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यामुळे इतर सहकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

या संदर्भात अनेक दिवस तिथे चर्चा सुरू होती. देशपातळीवर जी चर्चा आहे. राज्याची परिस्थिती आहे, त्यावर विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही एकत्र आलो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 9 वर्ष सरकार सुरू आहे. देशाला मजबुतीने पुढे नेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असा प्रयत्न सुरू असताना पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.विरोधी पक्ष एकत्र बैठका करत आहेत, कुठे ममतादीदी त्यांच्या राज्यात बैठका करत आहे, केजरीवाल त्यांच्या राज्यात काम करत आहे. जेव्हा यांची बैठक होते तेव्हा आऊटपूट काहीच निघत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments