Sunday, December 3, 2023
Homeगुन्हेगारीअपघात का झाला ? बस चालक दानिश शेखचा मोठा दावा…

अपघात का झाला ? बस चालक दानिश शेखचा मोठा दावा…

अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितलं आहे, की बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, हे तपासानंतरच समोर येईल.

समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव अपघातावेळी झोपला होता. दुसऱ्या ड्रायव्हरलाही किरकोळ दुखापत झालेली आहे.

अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितलं आहे, की बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, हे तपासानंतरच समोर येईल. अपघातग्रस्त गाडीचे सर्व टायर जळून खाक झाले आहेत. टायर फुटल्याचा काहीही पुरावा किंवा निशाणी घटनास्थळी मिळालेली नाही. त्यामुळे खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागली होती ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बसचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. बसला आग लागताच यातील 8 प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुर्दैवी 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आता हा आकडा 26 वर पोहोचला असल्याचंही समोर येत आहे.

डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले प्रवासी संभाजीनगरचे असल्याचं समोर आलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments