वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची भररस्त्यात धिंड काढून पोलिसांनी आरोपींना चांगलीच आद्दल घडवली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमच्या सनी भाईला का मारला म्हणत दारूच्या नशेत आरोपींनी साते ते आठ गाड्यांची तोडफोड केली होती. शहरातील चिखली परिसरातील घरकुल चेरी चौक परिसरात हा प्रकार घडला होता. दरम्यान आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांची त्या परिसरातून धिंड काढण्यात आली आहे.
अल्ताफ बाबू शेख आणि सोमनाथ देवराम गडदे अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली आहे. पोलिसांनी उचललेल्या या पाऊलांमुळे गुन्हेगारांना चांगलाच चाप बसला आहे.
आमच्या सनी भाईला का मारलं म्हणत आरोपींनी हातात कोयते घेत सात ते आठ वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अल्ताफ बाबू शेख आणि सोमनाथ देवराम गडदे अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. नागरिकांची भीती दूर व्हावी यासाठी पोलिसांनी या परिसरातून आरोपींची धिंड काढली.