तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते आज पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सहाशे वाहनांचा ताफा आणि आपल्या मंत्रिमंडळासह सोमवारी सोलापुरात दाखल झाले. ते आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. मात्र केवळ केसीआर यांनाच विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व मंत्री आणि इतर जणांना रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. आषाढी वारी निमित्त हजारो वारकरी पंढरपुरात पायी चालत येतात, त्यांच्या दर्शनामध्ये अडचण नको म्हणून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.’
केसीआर यांचं पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन
बीआरएसनं महाराष्ट्राच्या राजकारणात एण्ट्री केली आहे. बीआरएस महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी सर्वच निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आता सोलापूर जिल्ह्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. केसीआर हे सहाशे वाहानांचा ताफा आणि आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत. ते आज पंढरपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
भगीरथ भालकेंचा पक्ष प्रवेश
विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर बीआरएसचा शेतकरी मेळावा देखील होणार आहे. याच शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालके यांच्या बीआरएस प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.