Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीचिंचवडमध्ये कोण जिंकणार..? महेश लांडगेंनी शेअर केलेल्या पोलमध्ये नक्की काय आहे.. ?...

चिंचवडमध्ये कोण जिंकणार..? महेश लांडगेंनी शेअर केलेल्या पोलमध्ये नक्की काय आहे.. ? पोलमधील आकडेवारीने भाजपची चिंता का वाढली…?

पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोलमध्ये लोकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना पसंती दर्शवल्याचं स्पष्ट झालं आहे.यामध्ये भाजपची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे हे उमेदवार आहेत. तसंच शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. चिंचवडमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र या दाव्याला पक्षाचेच आमदार महेश लांडगे यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या पोलमधून धक्का बसला आहे.

पोलमध्ये नक्की काय आहे?

‘स्मार्ट पोल्स’ नावाच्या वेबसाइटने घेतलेल्या या पोलमध्ये तब्बल ४५ टक्के लोकांनी नाना काटे यांना आपली पसंती दाखवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या अश्विनी जगताप यांना ३१ टक्के तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना २३ टक्के लोकांनी समर्थन दिलं आहे. या पोलमध्ये आतापर्यंत एकूण १५ हजार ६६१ नागरिकांनी आपलं मत नोंदवलं आहे.दरम्यान, आमदार महेश लांडगे आणि दिवंगत लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील हुकमी एक्के म्हणून ओळखले जात. मात्र लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपची संपूर्ण धुरा महेश लांडगे यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अशातच महेश लांडगे यांनी चिंचवडचा आमदार कोण, हा स्मार्ट पोल्स वेबसाइटचा पोल आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. मात्र या पोलमध्ये नागरिकांनी नाना काटे यांच्या बाजूने आपला कल दाखवल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments