Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीशिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत कोणावर बॉम्ब फोडणार…? भाजपचे 'ते'...

शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत कोणावर बॉम्ब फोडणार…? भाजपचे ‘ते’ साडेतीन कोण..?

पुढील काही दिवसात भाजपचे साडेतीन जण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारी म्हणाले आणि एकच राजकीय धुरळा उडाला. भाजपचे ते ‘साडेतीन’ कोण? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी फार काळ वाट पहावी लागाणार नाही. कारण खुद्द संजय राऊतच या प्रश्नाचं उत्तर आज (मंगळवारी) देणार आहेत. तर दुपारी चार वाजता शिवसेना भवनात खास पत्रकार परिषद घेत राऊत बॉम्ब फोडणार आहेत. “यावेळी शिवसेना बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. किरीट सोमय्या यांचे आरोप, ईडीच्या कारवाईवर पत्रकार परिषद घेणार आहे.

महाराष्ट्र खोटारडेपणाविरोधात लढेल. ही पत्रकार परिषद विरोधकांनी ऐकावी, केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी” असं आव्हानही राऊतांनी दिलंय.गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपच्या याच आरोपांना आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेबाबत काल म्हटलं होतं, “भाजपचे नेते सतत सांगत आहेत ना, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल. मला असं वाटतं पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. महाराष्ट्रात सुद्दा सरकार आहे हे लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेत्रृत्वातलं आहे.”

‘महाराष्ट्रच्या जनतेचं लक्ष माझ्या पत्रकार परिषदेकडे हवं. जनतेला माझी ही पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. केंद्रीय तपास यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनी ऐकायला हवी. शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे, तुमचे धंदे बंद होतील’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

कुठे आणि किती वाजता पत्रकार परिषद ?

शिवसेनेची ही पत्रकार परिषद शिवसेनाभवनात आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. आता शिवसेना भाजपच्या कुठल्या नेत्यांबाबत आणि काय गौप्यस्फोट करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments