16 जुलै 1937 रोजी जरीना रशीद यांचा जन्म ब्रिटिश भारतातील अलीगढ येथे शेख अब्दुर रशीद यांच्या पोटी झाला ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापक होते आणि त्यांची आई फहमिदा बेगम एक गृहिणी होत्या
1958 मध्ये जरीना यांनी अलिगढमधून गणित विषयात पदवी, बीएस (ऑनर्स) मिळवली .त्यानंतर तिने थायलंडमधील विविध प्रिंटमेकिंग पद्धतींचा अभ्यास केला आणि पॅरिसमधील अटेलियर 17 स्टुडिओमध्ये स्टॅनले विल्यम हेटर आणि टोकियो, जपानमधील प्रिंटमेकर तोशी योशिदा यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. .झरीना 1977 रोजी न्यूयॉर्क शहराज स्थलांतरित झाली आणि तेथील महिला कलाकारांच्या मदतीला धावली. तेथील हेरिसीज कलेक्टिव्हची ती सदस्य झाली आणि राजकारण, कला आणि सामाजिक न्याया अशा अनेक गोष्टींसाठी तिने पुढाकार घेतला. त्यानंतर तिने न्यूयॉर्क फेमिनिस्ट आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून नव्या प्रवासाची सुरुवात केली. या माध्यमातून तिने महिला कलाकारांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिली.
![](https://news14live.com/wp-content/uploads/2023/07/Life_edited_edited.webp)
जरीना हाश्मी: पुरस्कार :
2007: रेसिडेन्सी, रिचमंड विद्यापीठ , रिचमंड, व्हर्जिनिया
2006: रेसिडेन्सी, मोंटाल्व्हो आर्ट्स सेंटर, साराटोगा, कॅलिफोर्निया
2002: रेसिडेन्सी, विल्यम्स कॉलेज , विल्यमस्टाउन, मॅसॅच्युसेट्स
1994: रेसिडेन्सी, आर्ट-ओमी, ओमी, न्यूयॉर्क
1991: रेसिडेन्सी, महिला स्टुडिओ वर्कशॉप , रोसेंडेल, न्यूयॉर्क
1990: अॅडॉल्फ आणि एस्थर गॉटलीब फाउंडेशन अनुदान, कला फेलोशिपसाठी न्यूयॉर्क फाउंडेशन
१९८९: ग्रँड प्राइज, इंटरनॅशनल द्विवार्षिक प्रिंट्स, भोपाळ, भारत
1985: न्यूयॉर्क फाउंडेशन फॉर आर्ट्स फेलोशिप, न्यूयॉर्क
1984: प्रिंटमेकिंग वर्कशॉप फेलोशिप, न्यूयॉर्क
१९७४: जपान फाउंडेशन फेलोशिप, टोकियो
१९६९: प्रिंटमेकिंगसाठी राष्ट्रपती पुरस्कार, भारत
![](https://news14live.com/wp-content/uploads/2023/07/EWhaLLMU4AADnDu-1.jpg)
जरीना हाश्मी: मृत्यूचे कारण :
25 एप्रिल 2020 रोजी अल्झायमर रोगामुळे लंडनमध्ये झरीनाचा मृत्यू झाला.
आज 16 जुलै 2023 रोजी, जरीनाच्या 86 व्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ झरीनाच्या कार्यांनी प्रेरित Google Doodle प्रकाशित करण्यात आले.