Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचा अध्यक्ष कोण..? आज होणार फैसला

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचा अध्यक्ष कोण..? आज होणार फैसला

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (महापालिका) स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड आज विशेष महासभेत होणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षला सर्वाधिक ११ जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला ४ तर शिवसेनाला १ जागा मिळणार आहे. त्याचबरोबर विविध विषय समित्यांच्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.

महापालिकेत विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक अशा विषय समित्या कार्यरत असून प्रत्येक समितीत ९ सदस्य असतात. सभागृहातील संख्याबळानुसार सदस्यसंख्या ठरवली जाते. भाजपच्या मोठ्या संख्याबळामुळे बहुतेक विषय समित्यांमध्येही त्यांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडेच जाण्याची शक्यता असून पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. पूर्वी इतर पक्षांत असलेले आणि नंतर भाजपमध्ये दाखल झालेले काही नगरसेवकांनाही संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. अनुभवी नगरसेवकांना प्राधान्य दिले जाणार की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, विषय समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना स्थान मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आजच्या बैठकीत सदस्यांची अंतिम नावे जाहीर होणार असून त्यानंतर अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments