Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीमहायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश…? वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी..!

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश…? वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी..!

निकालानंतर १२ दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरेच तर्क-वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? यावरून बराच काथ्याकूट झाला. अखेर ५ डिसेंबरला शपथविधीला अवघे २ तास उरले असताना एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि ५.३० वाजता आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला.

यानंतर आता काल १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार पार पडला. नागपूर येथील विधीमंडळात हा पहिलाच मंत्रीमंडळ विस्तार आहे. एकूण ३९ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. या ३९ मंत्र्यांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी
क्रमांक पक्ष मंत्र्यांचं नाव जबाबदारी/खातं
भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
१ भाजपा चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री
२ भाजपा मंगलप्रभात लोढा कॅबिनेट मंत्री
३ भाजपा राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री
४ भाजपा पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री
५ भाजपा गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री
६ भाजपा गणेश नाईक कॅबिनेट मंत्री
७ भाजपा चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री
८ भाजपा आशिष शेलार कॅबिनेट मंत्री
९ भाजपा अतुल सावे कॅबिनेट मंत्री
१० भाजपा संजय सावकारे कॅबिनेट मंत्री
११ भाजपा अशोक उईके कॅबिनेट मंत्री
१२ भाजपा आकाश फुंडकर कॅबिनेट मंत्री
१३ भाजपा माधुरी मिसाळ राज्यमंत्री
१४ भाजपा जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री
१५ भाजपा मेघना बोर्डीकर राज्यमंत्री
१६ भाजपा पंकज भोयर राज्यमंत्री
१७ भाजपा शिवेंद्रराजे भोसले कॅबिनेट मंत्री
१८ भाजपा नितेश राणे कॅबिनेट मंत्री
१९ भाजपा जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री
२० शिवसेना दादा भूसे कॅबिनेट मंत्री
२१ शिवसेना गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री
२२ शिवसेना संजय राठोड कॅबिनेट मंत्री
२३ शिवसेना उदय सांमत कॅबिनेट मंत्री
२४ शिवसेना शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री
२५ शिवसेना प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री
२६ शिवसेना योगेश कदम राज्यमंत्री
२७ शिवसेना आशिष जैस्वाल राज्यमंत्री
२८ शिवसेना भरत गोगावले कॅबिनेट मंत्री
२९ शिवसेना प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री
३० शिवसेना संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री
३१ राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री
३२ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री
३३ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री
३४ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे कॅबिनेट मंत्री
३५ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री
३६ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ कॅबिनेट मंत्री
३७ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री
३८ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री
३९ राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे राज्यमंत्री
कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार?
मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला असून आता उद्यापासून (१६ डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार? याची यादी लवकरच येण्याची शक्यता आहे. कारण मंत्र्यांना अधिवेशनात उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments