चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांंनी बंडखोरी करणार असं जाहीर केलं आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला. राहुल कलाटेंना नेमकी कोणाची फूस आहे असं विचारल्यास अजित पवार म्हणाले की, त्यांना कोणाची फूस आहे यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही मात्र ज्यावेळी राहुल कलाटे आणि माझी भेट होईल तेव्हा मी त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारीन असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांना भेटले यात राजकारण आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला कोणीही बंडखोरी करु नये, असं वाटणार त्याचप्रमाणे बंडखोरी केली तर मतांची विभागणी होणार आणि त्याचा भाजपला फायदा होणार,असं भाजपला वाटणार आहे. या गोष्टी साहजिक आहे. हे राजकारण आहे आणि राजकारणात या गोष्टी चालणार आहेत. त्यामुळे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.