Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमी“स्वत: ला समजतोस कोण, असे १०० सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”-...

“स्वत: ला समजतोस कोण, असे १०० सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”- अभिजीत बिचकुले

वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जाणारा अभिजीत बिचकुले बिग बॉस १५ मधून बाहेर पडला आहे. अभिजीतचा बिग बॉस १५ मधील प्रवास वादग्रस्तच होता. बिचुकले याच्या वागण्यामुळे अनेकदा सलमान खान ने त्याची कानउघडणी देखील केली होती. सलमानने केलेल्या या कानउघडणीवर बिचुकले देखील संतप्त झाला होता. त्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर त्याने सलमानवर चांगलीच आखपाखड केली.

‘सलमान खानला त्याच्यापेक्षा दुसरे कोणी मोठे झालेलं सहन होत नाही. त्याच्या सारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि माझी गल्ली झाडायला लावीन,’ अशी वक्तव्य करत बिचुकले ने नवीन वादाला सुरुवात केली आहे. दरम्यान, बिग बॉस १५ च्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या भागातून अभिजीत बिचकुले आणि देवोलिना भट्टाचार्जी हे दोघे घराबाहेर पडले आहे.

‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या अभिजीतने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉस १५ च्या घरात प्रवेश केला. घरामध्ये असतानादेखील त्याचं वागणं आक्रमकच होतं. राखी सावंतसह अनेक स्पर्धकांशी त्याने कायम पंगा घेतला होता. त्याच्या या वागण्यामुळे विकेंड का वार मध्ये सलमानने त्याचे अनेकदा कानउघडणीही केली होती. त्यावेळी सलमान म्हणाला होता की, ‘तू ज्या अर्वाच्च भाषेत बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी बोलतोस तसेच तू तुझ्या कुटुंबाशी बोलशील का? पुन्हा जर अशी भाषा मी ऐकली तर तुझे केस ओढून मी घराबाहेर खेचत आणून तुला मारेन.’

त्यावर बिचकुले त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागतो. पण सलमान त्याच्यावर प्रचंड भडकला आणि त्याने कठोर भाषेत त्याला गप्प बसायला सांगितले. यावर बिचुकले बिथरला अन् तडक उठून घराच्या दरवाजाजवळ जाऊन तावातावाने दार उघडायला सांगू लागला. घरात राहण्याची इच्छा नसल्याचेही त्याने सांगितले. त्यावर बिग बॉस यांनी त्याला तसे न करण्यास सांगितल्यामुळे बिचुकलेने हा निर्णय मागे घेतला. आता बिग बॉस १५ च्या घरातून बाहेर आल्यानंतर बिचकुले याने सलमानवर यथेच्छ टीका करत तोंडसुख घेतलं आहे.

बिचुकले म्हणाला की, ‘बिग बॉसच्या घरात माझ्यावर अनेकदा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने आतापर्यंत १४ सिझन केले आहेत. त्यामुळे त्याला वाटतं की हा कार्यक्रम तोच चालवतो. मात्र हे १५ वे पर्व माझ्यामुळे चालले. या पर्वाच्या सादरीकरणामध्ये सलमान कमी पडला. त्याला समोरची व्यक्ती त्याच्यापेक्षा मोठी झालेली सहन होत नाही. त्यामुळेच त्याने माझ्याविरोधात जी भाषा वापरली ती आतापर्यंत कुणीही वापरली नव्हती. माझ्यासारखा ढाण्या वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो वाटेल तसा हंटर फिरवत होता. आता हा वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे. सलमान स्वत: ला समजतो तरी काय? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे ते.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments