Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीमदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहताना जे. पी. नड्डा म्हणाले...

मदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहताना जे. पी. नड्डा म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस मदनदास देवी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस मदनदास देवी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

मदनदास देवी यांचे सोमवारी (२४ जुलै) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबा‌ळे यांनी देवी यांचे पार्थिव पुण्याला आणले. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता शनिवार पेठेतील मोतीबाग कार्यालय येथे अंत्यदर्शन सुरू झाले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही या वेळी अंत्यदर्शन घेतले.

मदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहताना जे. पी. नड्डा म्हणाले, देवी यांनी हजारो कार्यकर्त्यांना दृष्टी, दिशा, संस्कार आणि जगण्याचे उद्दिष्ट दिले. कोणत्याही कार्यकर्त्याचा त्यांच्याशी सहज संवाद होत असे. त्यांनी संघ कार्य सुरू केले तेव्हा आपल्याकडे सर्वच गोष्टींचा अभाव होता. मात्र, त्यावर मात करत काम करणाऱ्या देवी यांनी कुशल संघटक कसा असावा याचे आदर्श उदाहरण आपल्या कार्यातून निर्माण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments