छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस म्हणजे बिग बॉस शो. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनला सुरुवाता झाली असून पहिल्याच आठवड्यापासून हा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळख असलेला बिग बॉस मराठीचा यंदाचा हंगामही पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात किर्तनकारांपासून कलाकारांसह सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्सही सामील झाले आहेत.
सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार कोण?
बिग बॉस मराठीच्या घरात हळूहळू सर्व सदस्य बिग बॉसचा गेम समजताना आणि आपला खेळ खेळताना दिसत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चा आहे, ती म्हणजे निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांची. 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवलेल्या वर्षा उसगांवकर यांना नव्या रुपात पाहताना प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी की अभिजीत सावंत?
यंदाच्या सीझनमध्ये कोणत्या स्पर्धकाला सर्वाधिक मानधन मिळालं आहे, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणार्या स्पर्धकांमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर, गायक अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांच्या नावाची चर्चा आहे. यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक कोण आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस मराठीसाठी वर्षा उसगांवकर यांना दर आठवड्याला 2.50 लाख इतके मानधन मिळत आहे. तर गायक अभिजीत सावंतला दर आठवडा 3.50 लाख फी मिळते. यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा सदस्य निक्की तांबोळी आहे. निक्की तांबोळी हिला बिग बॉस शोसाठी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये मानधन मिळते, असं सांगितलं जात आहे.