बिबट्यासोबत 7 तास कुत्रा शौचालयात एकत्र अडकल्यावर कुत्र्याचा त्याने फडशा पाडला असेल असेच सर्वांना वाटले असेल. पण थांबा एवढ्या वेळ अडकूनही तो कुत्रा जिवंत राहिला. कसा ?
तर ही घटना आहे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिलिनेले गावातली. याठिकाणी एका शौचालयामध्ये बिबट्या आणि कुत्रा अडकले होते. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. द न्यूज मिनिटच्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, ‘कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या एका शौचालयात घुसला. एक महिला सकाळी 7 वाजता घराबाहेर असलेल्या शौचालयामध्ये जात होती तेवढ्यात तिची नजर आतमध्ये असलेल्या बिबट्यावर गेली. तिने ताबडतोब शौचालयाच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावली आणि तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.’
प्रज्वल मनिपाल या युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवर शौचालयात अडकलेल्या बिबट्या आणि कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. त्याने ट्वीटच्या माध्यमातून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन विषयी माहिती दिली आहे. या फोटोमध्ये शौचालयाच्या दरवाजाच्या शेजारी पांढऱ्या रंगाचा कुत्रा बसलेला दिसत आहे तर काही अंतरावर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बिबट्या बसलेला दिसत आहे. शौचालयाच्या छतावरील पत्रे काढून हा फोटो काढण्यात आला आहे.