भारतीय संघाने ट्वेन्टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर ६ धावांनी शानदार विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्री संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. भारतीय संघाने विजयासाठी १२० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारतीय संघाने शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला २० ओव्हरमध्ये ११३ धावांवर रोखलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. भारतीय संघाने दिलेल्या १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान विजयाच्या जवळ आला होता. मात्र, भारतीय संघांच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने यावर प्रतिक्रिया देत या पराभवाचे कारण सांगितलं आहे. जास्त डॉट बॉल खेळल्यामुळे पराभव झाल्याचं कारण कर्णधार बाबर आझमने सांगितलं आहे.
कर्णधार बाबर आझम म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण फलंदाजी करत असताना आम्ही विकेट गमावल्या. त्यात अनेक डॉट बॉल खळलो. त्यामुळे आम्हाला विजयापर्यंत पोहतचा आले नाही. आम्ही सामान्यपणे खेळण्यासाठी डावपेच सोपे होते. स्ट्राइक रोटेशन आणि चौकार मारण्याची योजना होती. पण याचवेळी खूप डॉट बॉल्स खळलो, त्यामुळे विजयापर्यंत जाता आलं नाही. तसेच विकेट गेल्यामुळे चांगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये शेवटच्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा ठेवता येत नाहीत”, अशी प्रतिक्रिया बाबर आझमने दिली.
पाकिस्तानची सुरूवात चांगली, पण…
पाकिस्तानची सुरूवात लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली झाली. मात्र, भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. बाबर आझम, उस्मान खान, फखर जमान हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी १३ धावा करत बाद झाले. तर इमाद वसीम १५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने ४४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या, पण तोही १५ व्या षटकात बुमराहकडून क्लीन बोल्ड झाला. याशिवाय पाकिस्तानचे इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले. पाकिस्तानचा संघ १५ षटकांनंतर एकही चौकार षटकार लगावू शकला नाही. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक चौकार लागला पण तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता.