Tuesday, December 5, 2023
Homeगुन्हेगारीकाय आहे पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’..?

काय आहे पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’..?

शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. मागील सात महिन्यांत २१ संघटित टोळ्यांमधील २०९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली.

शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. मागील सात महिन्यांत २१ संघटित टोळ्यांमधील २०९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गुन्हे केलेल्या चौहान टोळीवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

पिंपरीतील टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहान (वय २६, रा. नेहरुनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय २०), रोहित प्रविण धवणे (वय २०, दोघे रा. महेशनगर, पिंपरी), अक्षय अण्णा रणदिवे (वय २९, रा. एमआयडीसी, भोसरी) यांना अटक करत मोक्काची कारवाई केली. तर, सोन्या रणदिवे (रा. नेहरुनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो पसार आहे.

या टोळीतील आरोपींच्या विरोधात पिंपरी, पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण करणे, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खंडणी मागणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड असे विविध गंभीर ३८ गुन्हे दाखल आहेत. स्वतंत्रपणे १२ गुन्ह्यांसह ३२ गुन्हे केल्याची नोंद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, राज राजमाने, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments