Wednesday, December 6, 2023
Homeअर्थविश्वया अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळाले? काय महाग आणि काय स्वस्त झाले..

या अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळाले? काय महाग आणि काय स्वस्त झाले..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी जाहीर केल्या. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. याशिवाय, मोदी सरकारने अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. नव्या कर रचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. हा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी सीमाशुल्क, सेस आणि सरचार्जमध्ये बदल जाहीर केले. परदेशातून आयात होणाऱ्या खेळण्यांवरील सीमाशुल्क १३ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. याशिवाय, सायकलही स्वस्त होणार आहेत. तसेच लिथियम आयर्न बॅटरीवरील सीमाशुल्कही घटवण्यात आले आहे.

अर्थसंकल्पातील नव्या धोरणामुळे कोणत्या गोष्टी महाग होणार?

 • सोने आणि चांदीची परदेशातून आयात केलेली भांडी
 • सोने आणि चांदीचे परदेशातून आयात केलेले दागिने
 • प्लॅटिनमचे दागिने
 • विदेशी किचन चिमणी
 • ठराविक ब्रँडसच्या सिगारेट महागणार
 • छत्री
 • एक्स रे मशीन
 • हिरे

अर्थसंकल्पातील नव्या धोरणामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?

 • मोबाईल फोन
 • टीव्हीचे सुटे भाग
 • इलेक्ट्रिक कार
 • लिथियम आयर्न बॅटरी
 • परदेशातून आयात होणारी खेळणी
 • सायकल
 • बायोगॅस संबंधी उपकरणे
 • एलईडी टीव्ही
 • मोबाईल कॅमेरा लेन्स
 • हिऱ्यांचे दागिने
 • कपडे
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments