Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकपुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय?

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय?

८ एप्रिल २०२१,
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (8 एप्रिल) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यात त्यांनी पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा यांची माहिती दिली. यावेळी त्यांनी अधिकाधिक बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करुन देत असल्याचीही माहिती दिली.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “13 फेब्रुवारीला शहरात दुसरी लाट सुरु झाली. 50 दिवसात 1250 रुग्णांची संख्या 46 हजारांवर पोहोचलीये. वेगाने कोरोनाचा प्रसार होतोय. 6 हजार 500 लोक हॉस्पिटलमध्ये त्यापैकी 555 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 4000 ऑक्सिजनवर आहेत. पॉझिटिव्ह रेट हा जवळपास 28 टक्के, तो कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.”
पुण्यात रुग्णांसाठी बेडची स्थिती कशी?

“21 मार्चला पुण्यात 3500 बेडस, 900 व्हेंटिलेटर, तर 2000 ऑक्सिजन बेड होते. 15 दिवसात यामध्ये दुप्पट वाढ केलीये. केंद्र शासनाच्या नियमानुसार 100 पेक्षा अधिक कामगार आहे त्यांना लसीकरण करणं बंधनकारक केलंय. त्यांना लस देण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आलीय. कार्यस्थळी जाऊन त्यांना लसीकरण करणार आहोत. 15 लोकांची टीम त्यासाठी असणार आहे. ESI हॉस्पिटल ताब्यात घेतोय. तिथं 90 बेड तयार करतोय. आर्मीचे 20 व्हेंटिलेटर आणि 19 ऑक्सिजन बेड मिळाले आहेत. अजून इतकेच बेड मिळणार आहेत. व्हेंटिलेटर बेड वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. फक्त 400 ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. 6 खासगी रुग्णालयात 100 टक्के कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करू,” अशी माहिती आयुक्तांनी दिली.

पुण्यातील कोरोना लसीकरणाची स्थिती काय?

विक्रम कुमार म्हणाले, “6 लाख लसीकरणाचे डोस मिळाले होते. 125 ठिकाणी लसीकरण सुरु आहे. दररोज 22 हजाराच्या वर लसीकरण करतोय. आता फक्त 25 हजार डोस शिल्लक आहेत. 3 लाख 22 हजार पुणेकरांवर मास्क न वापरल्याने कारवाई केलीय. 15 कोटी 77 लाख दंड गोळा केलाय. लोकांनी मास्क लावला पाहिजे.”

शहरात रेमडिसिव्हर औषधांची उपलब्धता किती?

“शहरात रेमडिसिव्हर औषधांच्या उपलब्धतेबाबत FDA सोबत चर्चा सुरू आहे. सध्या या औषधाच्या वितरणाची अडचण आहे. आज आणि उद्या ही अडचण दूर होईल. 2 हजार इंजेक्शन दोन दिवसांत मिळणार आहेत. हेल्पलाईन कॉल सेंटरचे खासगीकरण करण्यात आले आहे. दररोज 500 ते 600 कॉल येतात. 24 तास ही सेवा ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न आहेत,” असंही आयुक्तांनी नमूद केलं.

भविष्यात 100 टक्के बेड ताब्यात घेणार

“नवीन 100 डॉक्टर आणि 100 नर्सेची भरती केलीय आणि आणखी भरती प्रक्रिया राबवणार आहोत. बाहेरील लोक उपचारासाठी पुण्यात येतायेत, पण त्यांची आकडेवारी उपलब्ध नाहीये. 99 टक्के लोक बरे होऊन घरी जातायेत. 80 टक्के बेड अधिग्रहण करण्याची कारवाई सुरु आहे. भविष्यात 100 टक्के बेड ताब्यात घेणार आहोत. 7500 बेड ताब्यात घेतलेत. पुढच्या आठवड्यात 8300 बेड ताब्यात असतील. 45 हजार लसीचे डोस खासगी हॉस्पिटलच्या ताब्यात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments