२ जानेवारी २०२०,
पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित 19 वर्षाखालील मुलींच्या “विमेन्स व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे थेरगाव येथे आयोजन करण्यात आले होते, यातील आज अंतिम सामना व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विरुद्ध हेमंत पाटील अकॅडमी या दोन संघात झाला. यामध्ये व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीने विजेतेपद मिळविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विनय ओहोळ उपअभियंता pcmc मनपा ह्यांच्या हस्ते पार पडले,ह्यावेळी अकॅडमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, मोहन जाधव,शादाब शेख, भूषण सूर्यवंशी आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते, सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले.
अंतिम सामनावीर, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
मानसी तिवारी- वेंगसरकर अकॅडमी
बेस्ट बॅट्समन
श्रावणी देसाई – हेमंत पाटील अकॅडमी
बेस्ट बोलर
प्रज्ञा विरकर – हेमंत पाटील अकॅडमी
बेस्ट फिल्डर
वैष्णवी पाटील-वेंगसरकर अकॅडमी