नुकत्याच पार पडलेल्या मुलींच्या अंडर १६ क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पि चि मनपा क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे ह्यांच्या हस्ते व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे उपस्थितीत पार पडला.
दिलीप वेंगसरकर म्हणाले की केवळ विरंगुळा म्हणून न खेळता मुलींनी देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सातत्य राखण्याबरोबरच आपल्या खेळात सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहून अधिक खडतर परिश्रम घेऊन शारीरिक क्षमता वाढवून तंदुरुस्ती बरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणेही गरजेचे आहे,कारण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामन्यात कलाटणी देता येते.
समारंभास अकॅडमीचे प्रशिक्षक शादाब शेख,भुषण सूर्यवंशी ,चंदन गंगावणे आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते, सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले.सकाळच्या सत्रातील अंतिम सामना आदित्य काळे स्पोर्ट्स अकॅडमी पराभूत विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी अंतिम सामनावीर खुशी मुल्ला , व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज सुहानी कहांडळ, वेंगसरकर अकॅडमी सर्वोत्तम गोलंदाज आचल आगरवाल, वेंगसरकर अकॅडमी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अनन्या कुलकर्णी , आदित्य काळे स्पोर्ट्स अकॅडमी , स्पर्धेचा सर्वोत्तम मानकरी खेळाडू ईश्वरी अवसरे आदित्य काळे स्पोर्ट्स अकॅडमी हे ठरले.