नुकत्याच पार पडलेल्या U-12 व्हेरॉक कप स्पर्धेत , व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीला विजेतेपद मिळाले यावेळी पारितोषिक वितरण समारंभ पिं चिं मनपाचे कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे ,उच्च न्यायालयाचे माजी सरकारी वकील ऍड. दीपक ठाकरे आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांच्या हस्ते पार पडला
लॉर्ड्स मैदानावर शतकांचा विक्रम करणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले ह्या मैदानावर उपलब्ध करून दिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोईसुविधांमुळे व उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षकांमुळे जागतिक स्तरावर अकॅडमीचे खेळाडू नैपुण्य दाखवीत आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे,,त्याचबरोबर खेळाडूंनी वरीष्ठ स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी शारीरिक क्षमता, लवचिकता व आहारावर अधिक लक्ष देणे गरजेचे असून क्षेत्ररक्षणा मध्ये अधिक सुधारणा करणे आवश्यक आहे.
सुनील वाघुंडे म्हणाले की मैदानावर आवश्यक कामे लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. समारंभास अकॅडमीचे प्रशिक्षक शादाब शेख,भुषण सूर्यवंशी ,चंदन गंगावणे आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते, सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले
यावेळी अंतिम सामना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध एच के बाऊन्स क्रिकेट अकॅडमीयांच्यात पार पडला. अंतिम सामनावीर
रुद्र पाटील ठरला तो व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीचा खेळाडू आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ओम पाटील तर सर्वोत्तम गोलंदाज
साईश बारटक्के ठरला हे दोघेही वेंगसरकर अकॅडमीचे खेळाडू आहे , सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ओम मालुसरे एच के बाऊन्स क्रिकेट अकॅडमी तर स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ओम पाटील ठरला.


