२३ नोव्हेंबर २०२०,
देवेंद्र फडणवीस यांना कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं टरबुज्या म्हटलेलं नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यामुळं त्यांनी राग मानून घेऊ नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जयंत पाटील पुण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या; तर मला चंपा म्हणतात. हे कसे चालते,’ असा आरोप पाटील यांनी केला होता. या आरोपांवर उत्तर देताना जयंत पाटील यांनी पक्षाकडून स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसनं कधीही टरबुज्या म्हटलं नाही. द्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यामुळं त्यांनी राग मानू नये. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही समर्थन देत नाही, असं स्पष्टी केलं आहे. तसंच, शरद पवारांनी आम्हाला कधी अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असा टोलाही जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे.
‘पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. त्यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल क्रमांक, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती,’ जयंत पाटील यांनी केला आहे.