३ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत येथील जलउपसा केंद्रात देखभाल दुरूस्तीचे काम गुरूवार दि.०४ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. गुरूवारी सकाळी शहराचा पाणी पुरवठा होईल. त्यानंतर पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.०४) सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा होणार नाही. तर शुक्रवारी (दि.०५) रोजी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा अनियमित होऊ शकतो अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत येथील जलउपसा केंद्रात विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गुरूवार दि.०४/०२/२०२१ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.