Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा उद्या गुरुवारी बंद.. नागरिकांनी पाणी जपून वापरावं

पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा उद्या गुरुवारी बंद.. नागरिकांनी पाणी जपून वापरावं

३१ मार्च २०२१,
रावेतच्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी (1 एप्रिल) पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठाही विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. यासाठी उद्या (1 एप्रिल) गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हे दुरुस्ती काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे शहरात होणार सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पवना धरणामधून पिंपरी चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे. सेक्टर क्र. 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक आणि पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments