पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये याकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र. २३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवार दि. १२/०६/२०२५ रोजी निगडी जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे.
त्या अनुषंगाने गुरुवार दि.१२/०६/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहील व दुस-या दिवशी शुक्रवार दि. १३/०६/२०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.