Monday, October 7, 2024
Homeगुन्हेगारीचिखली कुदळवाडीत आई आणि मुलीला बांधून ठेवून वॉचमनच्या कुटुंबानी टाकला २४ लाखांचा...

चिखली कुदळवाडीत आई आणि मुलीला बांधून ठेवून वॉचमनच्या कुटुंबानी टाकला २४ लाखांचा दरोडा

आई आणी मुलीचे हात-पाय बांधून २३ लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखली येथे घडली. दरोड्यात वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिनी आणि इतर दोन साथीदारांचा समावेश आहे.या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश सुनार हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून कामाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी आणि तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यानंतर बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधून ठेवले. “अगर मुहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्‍कम असा एकूण २३ लाख ६० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच, जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments