Sunday, July 20, 2025
Homeweather updateपुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाचा इशारा , IMD कडून अलर्ट

पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाचा इशारा , IMD कडून अलर्ट

राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनने राज्यभरात व्यापला आहे. मात्र, गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. आता मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली, तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुखावून जात आहेत. पावसातील खंडामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २७) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments