Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, किती प्रभाग असणार ? कशी आहे...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, किती प्रभाग असणार ? कशी आहे रचना जाणून घ्या…!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठीचा बहुप्रतीक्षित प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आज जाहीर झाला. जाहीर झालेल्या कच्च्या प्रारूप आराखड्यानुसार या निवडणुकीत महापालिकेचे ४६ प्रभाग असणार असून १३९ नगरसेवक त्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत. ४५ प्रभागात तीन सदस्यीय असणार आहेत तर एका प्रभागात ४ नगरसेवक असणार आहेत. एकूण१३९ प्रभागात २२ प्रभाग अनुसुचित जातीसाठी आणि ३ प्रभाग अनुसुचित जमातींसाठी आणि ११४ जागा खुल्या गटांसाठी असल्याची माहिती समोर आली आहे. मागील २०१७ च्या निवडणूकीत १२८ प्रभाग होते. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढत ती १३९ झाली आहे.

प्रारूप आराखड्यानुसार अशी आहे प्रभाग रचना …

प्रभाग क्रमांक १ – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर,
प्रभाग क्रमांक २ – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी
प्रभाग क्रमांक ३ – बो-हाडेवाडी, जाधववाडी
प्रभाग क्रमांक ४ – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी
प्रभाग क्रमांक ५ – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी
प्रभाग क्रमांक ६ – दिघी, गणेशनगर, बोपखेल
प्रभाग क्रमांक ७ – सँण्डविक कॉलनी, रामनगर
प्रभाग क्रमांक ८ – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग
प्रभाग क्रमांक ९ – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत
प्रभाग क्रमांक १० – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती
प्रभाग क्रमांक ११ – गवळीमाथा, बालाजीनगर
प्रभाग क्रमांक १२ – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती
प्रभाग क्रमांक १३ – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती
प्रभाग क्रमांक १४ – यमुनानगर, फुलेनगर
प्रभाग क्रमांक १५ – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर
प्रभाग क्रमांक १६ – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर
प्रभाग क्रमांक १७ – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक १८ – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी
प्रभाग क्रमांक १९ – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर
प्रभाग क्रमांक २० – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर
प्रभाग क्रमांक २१ – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी
प्रभाग क्रमांक २२ – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर
प्रभाग क्रमांक २३ – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत
प्रभाग क्रमांक २४ – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत
प्रभाग क्रमांक २५ – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती
प्रभाग क्रमांक २६– बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर
प्रभाग क्रमांक २७ – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह
प्रभाग क्रमांक २८ – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर
प्रभाग क्रमांक २९– भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल
प्रभाग क्रमांक ३०– पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर
प्रभाग क्रमांक ३१ – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर
प्रभाग क्रमांक ३२ – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर
प्रभाग क्रमांक ३३ – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर
प्रभाग क्रमांक ३४– बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी
प्रभाग क्रमांक ३५ – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर
प्रभाग क्रमांक ३६ – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल
प्रभाग क्रमांक ३७– ताथवडे, पुनावळे, काळाखडक
प्रभाग क्रमांक ३८– वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक ३९ – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर
प्रभाग क्रमांक ४०– पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम
प्रभाग क्रमांक ४१– पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती
प्रभाग क्रमांक ४२ – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर
प्रभाग क्रमांक ४३ – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक ४४ – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क
प्रभाग क्रमांक ४५ – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर
प्रभाग क्रमांक ४६ – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर

दरम्यान, प्रभाग रचना करताना नदी, उड्डाणपुल, रेल्वेलाईन, रस्ते अशा नैसर्गिक, भौगोलिक सीमांचे पालन केले असल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

प्रभागरचनेबाबत सूचना आणि हरकतींसाठीमागवल्या जाणार….

प्रभागरचनेबाबत हरकती व सूचना या लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्या समक्ष क्षेत्रीय अधिकारी किंवा महापालिका भवनातील निवडणूक विभागात द्याव्या लागणार आहेत. हरकती व सूचना १४ फेबु्रवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती १६ फेब्रुवारीस राज्य निवडणूक आयोगास सादर केल्या जातील. त्यावर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती महानगर पालिकेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments