२ नोव्हेंबर २०२०,
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता जिल्ह्यातील गड, किल्ले आणि डोंगर कड्यांवर भटकंतीला परवानगी दिली आहे.लॉकडाऊनमधीन नियमांना शिथिल करताना परवानगी दिली मात्र यासाठी गिर्यारोहकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. स्वतःचे आरोग्य, गावकऱयांचे आरोग्य आणि स्थानिक पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

राज्यातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्र गेल्या महिन्यातच सुरु झाली आहेत. पर्यटन सहली देखील आता वेग घेत आहेत. पण गिर्यारोहणाला प्रशासनाकडून अद्याप परवागनी मिळाली नव्हती. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकाऱयांना पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहण, ट्रेकिंगला परवानगी मिळावी, असे निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले, गड आणि कातळावरील मोहीमा सुरु करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. आता दिवाळीच्या सुट्टूयांचे निमित्त करुन किल्लाप्रेमींची भ्रमंती सुरु होणार आहे.