Wednesday, December 6, 2023
Homeताजी बातमीअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र अशा प्रमुख अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या बाबत नेमकी स्पष्टता नसल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. दरम्यान, आठवड्याभरात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

सीईटी सेलने नर्सिंग सीईटी वगळता विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सर्व सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्यानंतर सीईटी सेलने, अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्याचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यानुसार १५ जूनपासून अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार होती. त्यानुसार बीए- बीएस्सी बीएड आणि विधी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू झाली आहे. बीएड अभ्यासक्रम, विधी (तीन वर्षे) अभ्यासक्रम नोंदणी प्रक्रिया २३ जूनपासून सुरू होणार आहे. तर, इतर अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सीईटी सेलने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसार अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक विद्यार्थी संभ्रमात आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments