यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 66 ते 68 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा अर्थ प्रस्थापित सरकारविरोधातील वातावरण आहे, असा घेतला जातो. मात्र, यंदा महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे ) महायुतीला फायदा होईल का ? वाढलेले मतदान प्रस्थापितविरोधी लाट आहे का,? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.